6 वर्षांपासून परस्परांना करत आहेत डेट
बॉलिवूडनंतर आता टॉलिवूडमधील विवाहसोहळे सुरू झाले आहेत. अभिनेत्री नयनतारा प्रियकर दिग्दर्शक विग्नेश सिवन याच्यासोबत विवाह करणार आहे. हे जोडपे 9 जून रोजी महाबलीपुरममध्ये एका खासगी रिसॉर्टमध्ये विवाहाच्या बंधनात अडकतील. दोघांनीही स्वतःच्या विवाहाच्या तारखेची घोष्घ्णा चेन्नईतील एका पत्रकार परिषदेत केली आहे.
नयनतारा आणि विग्नेश यांनी अलिकडेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले होते. तसेच यावेळी अभिनेते तसेच राजकीय नेते उदयनिधी स्टॅलिन देखील उपस्थित होते. त्यांच्या या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाले होते.
चित्रपटसृष्टीशी जोडलेले असल्याने नयतनारा आणि विग्नेश यांची प्रेमकथा देखील फिल्मी आहे. या दोघांना एकत्र काम करताना प्रेमात पडल्याची जाणीव झाली होती. त्यानंतर दोघेही परस्परांना डेट करू लागले. 6 वर्षांच्या डेटिंगनंतर 25 मार्च 2021 रोजी त्यांना साखरपुडा केला होता.
विग्नेश यांचा चित्रपट ‘कथुवाकुला रेंडुकधल’ 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. यात विजय सेतुपति, नयनतारा आणि समांथा मुख्य भूमिकेत होती. विग्नेशच्या दिग्दर्शनातील नयनताराचा हा दुसरा चित्रपट होता. नयनताराचा ‘ओ2’ हा चित्रपट 17 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विवाहानंतर हे दोघेही ‘एके 62’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात सामील होतील.