नरकासूर स्पर्धा रद्दनरकासूर 5 फुट पर्यंत मर्यादीत
प्रतिनिधी/ पणजी
कोविडमुळे ज्याप्रकारे गणेश चतुर्थीला एसओपी महानगरपालिकेतर्फे काढण्यात आले होते. तश्याचप्रकारचे एसओपी दिवाळीला देखील काढण्यात आले आहे. मनपाने यावर्षी नरकासूर मर्यादापूर्वक करण्याचे ठरविले असून यावर्षी पणजीत कुठल्याही प्रकारचे नरकासूर स्पर्धा होणार आहे. तसेच जर कुणाला नरकासूर करायचे त्यांना 5 फुटपेक्षा जास्त करता येणार नाही. असे महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.
आता नरकासूर व दिवळी जवळ येत असल्याने पालिकेतर्फे बैठक घेऊन यावर वरील निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या एसओपीमध्ये नमुद करण्यात आले आहे की कुणालाही मुख्य रस्त्यावर नरकासूर उभा करता येणार नाही. तसेच साऊंड सिस्टम व फटाके लावायला परवानगी नसणार. एसओपीचे उल्लंघन केल्यास पोलिसांच्या सहाय्याने कारवाई करण्यात येणार असे मडकईकर यांनी पुढे सांगितले.
ज्यांना नरकासूर करायचा आहे त्यांनी या संदर्भातील निवेदनपत्र महानगरपालिकेला सादर करावे. जेणेकरुन एसओपी योग्य प्रकारे समजविण्यास मदत होईल. असेही मडकईकर यांनी यावेळी सांगितले.
कोरोना फैलण्याची शक्यता
दरवर्षी अनेक ठिकाणी 20 फुटपेक्षा अधिक उंचीचे नरकासूर केले जातात. नरकासूर पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते. तसेच अनेक रस्त्यावर ट्राफिकची समस्या तयार होत असते. अशावेळी गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो, याच अनुषंगाने हा निर्णय पालिकेतर्फे घेण्यात आला आहे. असेही मडकईकर म्हणाले.
चतुर्थीच्यावेळी पणजीवासीयांनी पूर्णपणे एसओपीचे पालन केले. आता देखील माझी विनंती आहे की लोकांनी या कोरोनाच्या काळात संयम पाळून दिवाळीचा उत्सव साजरा करावा. आणि एसओपीचे पालन करुन आम्हाला सहकार्य करावे. व पुढच्यावर्षी या महामारीतुन बाहेर पडत पुन्हा थाटामाटात उत्सव साजरा करुया. असे आवाहन देखील महापौर उदय मडकईकर यांनी केले.