प्रतिनिधी/ रत्नागिरी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक ड़ॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनातील संशयिताला 3 आठवडय़ासाठी रत्नागिरीत वास्तव्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आह़े विक्रम भावे असे या संशयिताचे नाव आह़े विक्रम याचे संगमेश्वर तालुक्यात वास्तव्याला असणाऱया वडिलांचे नुकतचे निधन झाल़े यानंतर वडिलांचे पुढील धार्मिक विधी पार पाडण्यासाठी विक्रमने उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होत़ी
विक्रम भावे याच्यावर नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनासाठी रेकी केल्याचा आरोप आह़े 6 मे रोजी त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होत़ा यावेळी भावे याला पुणे सोडून न जाण्याची अट न्यायालयाकडून घालण्यात आली होत़ी दरम्यान 25 जून रोजी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याने उच्च न्यायालयात देवरूख येथील गावी जाण्यासाठी परवानगी मागितली होत़ी या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने तपास यंत्रणेला आपली बाजू मांडण्यासाठी सांगितले होत़े यावेळी त्याला गावी जाण्यासाठी कोणताही आक्षेप नसल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आल़े यानंतर उच्च न्यायालयाने त्याला 3 आठवडय़ांसाठी रत्नागिरीत जाण्याची मुभा दिली आह़े मात्र या काळात त्याने जवळच्या पोलीस ठाण्यात नियमित हजेरी द्यावी, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत़
पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी नरेंद्र दाभोळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होत़ी या प्रकरणी पोलिसांनी सचिन अंदुरे व शरद केळकर यांना अटक केली होत़ी तपासामध्ये विक्रम भावे याने अंदुरे व केळकर याला रेकी करून मदत केल्याची माहिती समोर आल़ी त्यानुसार पोलिसांनी विक्रम भावे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होत़ा
अद्याप न्यायालयाकडून अधिकृत आदेश नाही
दाभोळकर खून प्रकरणातील संशयित आरोपी विक्रम भावे हा देवरूख या ठिकाणी येणार असल्याचे समजते आह़े मात्र अद्याप न्यायालयाकडून अधिकृत आदेश अथवा सूचना प्राप्त झालेली नाह़ी