राहुल गांधींचाही सहभाग असणार
नवी दिल्ली
मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणासह देशभरात अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाब व हरियाणामध्ये ट्रक्टर रॅली काढणार आहेत. रस्त्यावर उतरून शेतकरी आपला राग व्यक्त करत असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही शेतकरी आंदोलनात उडी घेतली आहे.
मोदी सरकारने आणलेल्या तीन नव्या कृषीविषयक कायद्यांबद्दलचा शेतकऱयांचा विरोध अजूनही मावळलेला नाही. पंजाब, हरियाणासह देशातील अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतला असून, 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान पंजाब व हरियाणामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रक्टर रॅली काढण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राहुल गांधी आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत.