नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत कौर राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राणा यांचे जाती प्रमाणपत्र बनावट आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे त्यांचे खासदारपद धोक्यात आले होते. तथापि, त्यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मंगळवारी त्यांच्या याचिकेवर प्राथमिक सुनावणी करण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. राणा यांनी आपण अनुसूचित जातीच्या असल्याचे दाखवत ही निवडणूक लढवून जिंकली होती. मात्र, त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राला आव्हान देण्यात आले होते.