नाईट कर्फ्युमुळे अनेकांचा हिरमोड, 31 डिसेंबर घरीच साजरा करण्यावर नागरिकांनी दिला भर
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांना कोरोना प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे 31 डिसेंबर तसेच नववर्षाच्या स्वागतावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे होणाऱया सर्वत्र पाटर्य़ांची धूम, रात्री बारा वाजता ओल्डमॅनचे दहन, शुभेच्छा संदेशांची देवाण-घेवाण आणि झगमगाट अशा प्रकारावर यावषीही निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने 2022 चे स्वागत करण्यात आले. काही भागांमध्ये बालचमुंनी केलेल्या ओल्डमॅनचे दहन करण्यात आले. मात्र निर्बंध असल्याने 10 च्या आत कार्यक्रम आटोपण्यात आले.
शुक्रवारी 2021 या सरत्या वर्षाला निरोप देवून 2022 या नव्या वर्षाचे स्वागत बेळगावकरांनी केले. हॅपी न्यू इअर म्हणत नववर्षाचे नवसंकल्प तडीस नेण्याची इच्छा अनेकांनी दर्शविली. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातूनच हा नवसंकल्प करावा लागला. विनाकारण रात्री 10 नंतर फिरणाऱयांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उगारला होता. त्यामुळे अनेकांनी घरी राहूनच नववर्षाचे स्वागत केले. काही तरुण मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक रम्य ठिकाणी गेले होते. तसेच शिवारामध्ये जाऊन मोजक्मयाच मित्रांच्या उपस्थितीत पाटर्य़ा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दरवषी दिसणारी शहरातील हुल्लडबाजी यावषी अत्यंत कमी प्रमाणात दिसून आली. पोलिसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तसेच गस्त ठेवली होती.
ख्रिस्ती बांधवांनी मध्यरात्री प्रार्थना सभांच्या माध्यमातून सुख-समृद्धी आणि शांतीची मागणी भगवंताकडे केली. ‘बाय बाय 2021’ म्हणतानाच नव्या ‘2022’ चे स्वागत केले. शुक्रवारी अनेकांनी मांसाहारी जेवणाचा बेत आखला. मात्र अधिकाधिक घरीच मांसाहार करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. दरवषी आठवडय़ाभरापासून सरत्या वर्षाला निरोप देण्याची पूर्वतयारी सुरू केली जाते. युवावर्ग विविध बेत आखण्यात दंग होतो. रात्री 12 च्या ठोक्याला नेहमीप्रमाणे ओल्डमॅनचे दहन करण्यात येते.
मात्र यावषी या साऱयांवर निर्बंध असल्यामुळे नवीन वर्षाचे शांततेत स्वागत करण्यात अनेकांनी धन्यता मानली.
कॅम्प विभाग ख्रिसमसपासून न्यू इअरपर्यंत दरवर्षी फुललेला असतो. नवनवी वस्त्रs परिधान केलेले ख्रिस्तीबांधव सायंकाळी बाहेर पडले होते. सायंकाळी उशीराने विविध चर्चमध्ये धर्मगुरुंच्या साक्षीने त्यांनी दरवर्षीप्रमाणेच प्रार्थना केली. यानंतर नववर्षाच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण सुरू होती. मात्र 10 पूर्वीच त्यांनीही सर्व कार्यक्रम आटोपता घेतला.
दिवसभरात नववर्षाचे संदेश सोशल मीडियावर झळकण्यास प्रारंभ झाला होता. शहरात ठिकठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस लक्ष ठेवून होते. काही ठिकाणी अतिमद्य प्राशन करुन धिंगाणा घालण्याचे प्रयत्नही झाले. त्यावर अटकाव घालण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. नवीन वर्षाचे नवसंकल्प घेऊन पुढील वाटचाल करण्याचा मनोदय अनेकांनी व्यक्त केला आहे.
कोरोना 2022 मध्ये तरी पूर्णपणे जावा, अशी प्रार्थना यावेळी नागरिकांनी केली. कोरोनामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सण साजरे करणे कठीण झाले आहे. 31 डिसेंबर गेल्या दोन वर्षांपासून साजरा करता आला नाही. त्यामुळे अनेकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. संभाव्य ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेवून सरकारने पुन्हा नाईट कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे 31 डिसेंबर व नववर्षाचे स्वागत अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले.