ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोनाग्रस्तांसाठी आपले तीन महिन्यांचे वेतन देऊ केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री मदतनिधीतही रक्कम जमा केली आहे.
जगभरात थैमान घालणाऱया कोरोना विषाणूचा भारतातही मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात प्रतिबंधत्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना आर्थिक मदतीची गरज आहे. त्याच भावनेतून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक त्यांनी आपले तीन महिन्यांचे वेतन कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओडिशामध्येही 14 जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरी, नयागढ, जगतसिंगपूर, जाजपूर, भद्रक, बालासोर, ढेंकनाल, संबलपूर, झारसुगुडा या जिल्हय़ांमध्ये मंगळवारी सकाळीपासून 29 मार्च रात्री 9 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.