परिवहनचे दुर्लक्ष : बसपास प्रक्रिया सुरळीत नसल्याने बसतोय आर्थिक भुर्दंड
प्रतिनिधी / बेळगाव
अंध, दिव्यांग व्यक्तींचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी परिवहन मंडळाच्यावतीने सवलतीच्या दरात वर्षभरासाठी बसपास उपलब्ध करून दिला जातो. यंदा संपूर्ण बसपास प्रक्रिया बदलली असून बसपास मिळविण्यासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज करावा लागत आहे. मात्र, नवीन बसपास काढण्यासाठी गेलेल्या दिव्यांग व्यक्तींना कसरत करावी लागत आहे.
नवीन बसपाससाठी अर्ज करून महिना उलटला तरी बसपास उपलब्ध होत नसल्याचे बसपासधारक सांगत आहेत. त्यामुळे बसपासचे काम सुरळीत करावे व तातडीने बसपास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बसपासधारकांतून होत आहे.
परिवहन मंडळाकडून दिव्यांगांना देण्यात येणाऱया बसपास नूतनीकरणाची मुदत फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना फेब्रुवारीपर्यंत जुना बसपास दाखवून प्रवास करता येणार आहे. मात्र, वर्षभराच्या बसपाससाठी बसपास नूतनीकरण करणे गरजेचे आहे. ऑनलाईन अर्ज केलेली पावती व बॉण्ड विभागीय संचार कार्यालयात देणे बंधनकारक आहे. त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून 660 रुपयात बसपास उपलब्ध होणार आहे.
काही दिव्यांग व्यक्तींनी नवीन बसपाससाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यांना वेळेत बसपास देण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी दिव्यांगांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 40 टक्क्मयांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र, बसपासची प्रक्रिया बदलल्याने तो मिळविण्यासाठी नाहक त्रास होत आहे.
बसपाससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, युडीआयडी कार्डची प्रत, ऑनलाईन अर्जाची प्रत आदी 660 रुपये शुल्क भरून विभागीय संचार कार्यालयातील बसपास विभागात जमा करणे बंधनकारक आहे.