ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नव्या कोरोना विषाणूला (सार्स-कोव्ह-2) घसा किंवा फुफ्फुसांच्या तुलनेत नाकातील पेशींना लक्ष्य बनवणे अधिक सोपे असते. त्यामुळे हा विषाणू सुरुवातीला नाकातील पेशींवर हल्ला करून आपली संख्या 1 कोटींपर्यंत नेऊ शकतो, असे नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे.
नाकातील ‘नेसल एपीथिलियम’ नावाच्या पेशी कोरोना विषाणूच्या सर्वात आधी शिकार बनतात. कोरोना विषाणू नाकातील पेशींमध्ये घुसला तर तो चार दिवसात आपली संख्या एक कोटींपर्यंत नेऊ शकतो. त्यानंतर तो श्वासनलिकेच्या मार्गाने घसा आणि फुफ्फुसातही घुसतो. त्यामुळे नागरिकांनी तोंडाबरोबरच नाकावरही मास्क ठेवावा.
संशोधकांच्या अभ्यासात रुग्णाच्या नाकात चार दिवसात एक कोटी विषाणूच्या प्रतिकृती तयार झाल्याचे निदर्शनास आले. त्या तुलनेत फुफ्फुसात ही संख्या 10 हजारांच्या जवळपास होती. त्यामुळे नाक मास्क अथवा रुमालाने चांगले झाकणे आवश्यक आहे.