प्रतिनिधी/ सातारा
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दारुची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर आतल्या दाराने दारुची विक्री सुरु आहे. राज्याच्या मंत्र्यांनीही अवैध दारु विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. त्यानुसार सोमवारी सकाळीच राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सातारा तालुक्यातील नागठाणे येथील अविनाश साळुंखे याच्या अवैध दारुच्या गुत्यावर छापा मारुन कारवाई केली. 7हजार 488 रुपयांच्या 144 देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चाकसकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर.एल.पुजारी, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, अजित रसाळ, सचिन खाडे, महेश मोहिते, संतोष निकम, नितीन जाधव यांनी केली. अविनाश अरविंद साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास निरीक्षक पुजारी करत आहेत.