एल. के. सरतापे / म्हसवड :
कोरोना काळात पर्यवरणाचा समतोल राखण्यासाठी समाजकारण, राजकारण, अध्यात्मिक व गृहिणी म्हणून आणि पत्नी म्हणून सुवर्णा सुनील पोरे यांनी म्हसवडमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये जाऊन नाष्टा व चहा देऊन जे अनाथ, फिरस्ती, वेडसर व वृध्दांना दिले. गरीब कुटूंबास अन्नधान्य, समाजातील गरीब कुटुंबास मदतीचा हात, घरोघरी मास्क, सॅनिटायझरसह असैनिक अल्बम गोळा वाटप, रुग्णांना वेळेत उपचार मिळावा यासाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर अद्ययावत अशी रुग्णवाहिका आणून सामाजिक काम केले त्याच बरोबर प्रर्यावरण संतुलित रहावे यासाठी ग्रामीण भागात वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबवला. वृक्षतोड न करण्याचे आवाहन करुन शुभम भारत गॅसच्या माध्यमातून माण तालुक्यात घर तेथे गॅस ही शासकीय योजना राबवून पर्यवरणाचा होत असलेला ऱ्हास थांबवण्याचे काम करणाऱ्या म्हसवडच्या सुवर्णा सुनिल पोरे या आधुनिक युगातील दुर्गा आहेत.
म्हसवडसारख्या ग्रामीण भागात गेली 15 वर्षापूर्वी गॅस मिळणे अवघड होते. सातारा, फलटण, कराड, पंढरपुर आदी ठिकाणावरुन गॅस आणला जात होता. बांधकाम विभागात इंजिनियर असलेले सुनिल पोरे यांनी म्हसवड येथे शुभम भारत गॅस हि एजन्सी सुरु करुन म्हसवडच नव्हे माण तालुक्यात होता असलेले प्रदुषण थांबवण्याचा विडा उचलून हि गॅस एजन्सी आपली पत्नी सुवर्णाताई यांच्या ताब्यात दिली. सुवर्णाताई पोरे यांनी सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातुन प्रदुषणमुक्त माण हि संकल्पना राबवली. घर तेथे गॅस देवून गॅस कनेक्शन बरोबर एक झाड दिले. म्हसवडसह ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करुन त्यांना पर्यावरणाचे महत्व पटवुन देत महिला जागृतीचे काम मोठे केले. महिलांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहित करुन त्यांच्या हातची चव जगासमोर आणण्यासाठी पाककलेसारख्या स्पर्धांचे आयोजन केले. त्या स्पर्धेद्वारे त्या महिलांच्या घरगुती पदार्थांना बाजारपेठ मिळवून दिली आहे.
महिलांसाठी आरोग्य शिबिर, डोळे तपासणी, मोती बिंदू तपासणी, रक्तदान शिबिर भरवली. सिध्दनाथ यात्रेत येणाऱ्या भाविकांना व आषाढ़ी वारीला मोफत अन्नदान, चहा, नाष्टा व दूध वाटप त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व उपचार असे नवनवीन उपक्रम राबवले. माण तालुक्यात गतवर्षी राबवलेला पाणी फाउंडेशन या उपक्रमात स्वतः आपले पती सुनिल पोरेसाहेब आणि गॅस एजन्सी मधील कामगारांना सोबत घेऊन श्रमदान करुन नाष्टा व चहा देवून मदतीचा हात दिला. म्हसवड येथील संत नामदेव महाराज मंदिर मोडकळीस आले होते. त्याचा जीर्णोद्धार करुन दरवर्षी जयंती सुरु करण्याची प्रथा सुरु केले. हे सर्व करत असताना आपल्या संसासाकडेही त्यांनी दुर्लक्ष केले नाही. आपले पती सुनिल पोरे हे सातारा येथील बाधकाम विभागात अधिकारी असल्याने सर्व जबाबदारी स्वतः खांद्यावर घेतली. तसेच आपल्या तीनही मुलांना उच्च शिक्षित केले. एक मुलगा वकिल, दुसरा ऑटोमोबाइल मॅकेनिक, तर एक मुलगी डॉक्टर केले हे सर्व करण्यासाठी जे पाठबळ दिले ते आमच्या साहेबांनी म्हणजे पोरे साहेबांनी दिल्यानेच हे सर्व करु शकले.