प्रतिनिधी /मडगाव
नावेली मतदारसंघ महिला मोर्चातर्फे भाजपाच्या महिला नेत्या रंजू पै आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा व रूमडामळ पंचायतीच्या उपसरपंच मधुकला शिरोडकर यांच्या उपस्थितीत महिलांना रोपटी वाटण्यात आली. रंजू पै म्हणाल्या की, प्रत्येक पावसाळय़ात आम्ही रोपटी लावतो. परंतु किती झाडे टिकली हे महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रत्येक महिलेने एक तरी झाड लावून त्याची काळजी घेणार, योग्य देखरेख ठेवणार असा संकल्प करावा. शुद्ध प्राणवायू व निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करावे, असे त्यांनी सांगितले. अनुराधा मोघे, जयंती प्रभू, रूद्राक्षी तोरस्कर, संगीता नाईक, सिनारी यांच्या हस्ते रोपटय़ांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा दवर्ली पंचायतीचे सदस्य परेश नाईक, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेकर, अनुसूचित जाती मोर्चाचे उपाध्यक्ष विद्याधर आर्लेकर व इतर महिला उपस्थित होत्या.