प्रतिनिधी/ रत्नागिरी
पावसाच्या वातावरणा दरम्यान निरभ्र होणाऱया आकाशात रत्नागिरीतील खगोलप्रेमींना सध्या दररोज सूर्यास्तानंतर ‘निओवाईस’ धुमकेतू पाहण्याची पर्वणी लाभली आहे. 14 जुलैपासून हा धुमकेतू आकाशाच्या क्षितीजावर दिसू लागला असून येत्या 4 ऑगस्टपर्यंत हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी पाहण्याची अनोखी संधी लाभली आहे. या धुमकेतूची महाराष्ट्रातून सर्वांत स्पष्ट व सुंदर छायाचित्रे तालुक्यातील नेवरे येथील कपिल विनय केळकर या कॉलेज तरुणाने टिपली आहेत.
रत्नागिरी येथील बीएस्सीचा विद्यार्थी कपिल केळकर याने नेवरे, रत्नागिरी येथून 22 जुलै रोजी रात्री ही छायाचित्रे टिपली आहेत. खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी सर्वोत्कृष्ट छायाचित्र म्हणून त्याला सोशल मीडियावर गौरवले आहे. कपिल हा उत्तम छायाचित्रकार आहेच, पण गोगटे जोगळेकर महाविद्यालयात खगोल विश्वच्या सहकार्यानेन सुरू असलेल्या खगोल मंडळाचा कार्यकर्ता आहे.
सुर्याभोवती 6800 वर्षांची दीर्घ वर्तुळाकार कक्षा पूर्ण करणारा निओवाईज धूमकेतू पुन्हा पृथ्वीभोवतीच्या अवकाशात दिसू लागला आहे. हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी पाहण्याची अनोखी संधी खगोलप्रेमी तसेच नागरिकांना लाभली आहे. यापूर्वी हेल-बॉप, मॅकनॉट असे धूमकेतूंचे दर्शन झालेले होते. त्यानंतर आता निओवाईज धूमकेतू पाहण्याची पर्वणी लाभली आहे. 22 जुलै रोजी रात्री सव्वानऊ वाजता या धुमकेतूचे केळकर यांना रत्नागिरीतील नेवरे येथून दर्शन झाले. निकॉन डी 5200 या पॅमेऱयांने ऍपार्चर 3.8, शटर स्पीड 30 सेकंद, आयएसओ 1250 ठेवून हा धुमकेतू टिपला. उघडय़ा डोळ्यांनी धुमकेतू दिसला नाही तर डीएसएलआर पॅमेऱयातून दिसू शकतो. सूर्यास्तानंतर साधारण अर्ध्या तासाने वायव्य दिशेला दिशेला म्हणजे उत्तर-पश्चिम क्षितीजावर प्रेम सेट करून पॅमेऱयातून लाँग एक्स्पोजर देऊन फोटो घेणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे.