होन्निहाळनजीक सुसज्ज ‘सिद्धिविनायक कॉलनी’ : ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या ‘निधी कन्स्ट्रक्शन’च्या 12 व्या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. ग्राहकांच्या आग्रहास्तव पंत बाळेकुंद्रीजवळील होन्निहाळ येथे सर्वसोयींनी परिपूर्ण असा ‘सिद्धिविनायक कॉलनी’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये प्लॉट्स व बंगलोसाठीचे बुकिंग सुरू करण्यात आले असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.
निधी कन्स्ट्रक्शनने यापूर्वी केलेल्या 11 प्रकल्पांना ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. निधी कन्स्ट्रक्शनने विश्वासार्हता जपल्याने बेळगावमधील अनेक ग्राहकांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे निधी ग्रुपच्या नव्या प्रकल्पाची ग्राहकांना उत्सुकता होती.
प्रकल्पाची विशेषत:
पंतबाळेकुंद्री गावानजीकच्या होन्निहाळ येथे प्रकल्प तयार केला आहे. एन. ए. प्लॉट, ग्राम पंचायत लेआऊट, प्रवेशद्वार, गणेश मंदिर, 30 फुटांचे काँक्रीटचे रस्ते, आरसीसी गटारी, पथदीप, भूमिगत वीजवाहिन्या, गार्डन तसेच कर्जाची व्यवस्था या प्रकल्पांतर्गत उपलब्ध केली आहे. नुकताच या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. यावेळी राजू मुतगेकर, विजय पाटील,
ऍड. सुनील कलबुर्गी, परशराम कदम उपस्थित होते.
बुकिंग करणाऱयांना विशेष ऑफर
प्लॉट किंवा बंगला बुकिंग करणाऱया ग्राहकांना निधी गुपने विशेष ऑफर ठेवली आहे. 15 जानेवारीपर्यंत बुकिंग करणाऱया ग्राहकांना सोन्याचे 10 ग्रॅमचे नाणे भेट देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पाटील कॉम्प्लेक्स (हॉटेल एस. के. गार्डन), मुख्य मार्ग, पंत बाळेकुंद्री येथे अथवा 9341779315, 9035348451 वर संपर्काचे आवाहन केले आहे.