प्रतिनिधी/ निपाणी
येथील कार्तिकेश्वरनगर येथे असलेल्या कार्तिक मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त भाविकांनी दुपारी 12.47 ते सायंकाळी 6 यावेळेत कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. यानिमित्त सकाळी 6 वाजता अभिषेक व पूजा झाली. सकाळी 7 वाजता राहुल भाटले, रामनाथ लोहार, तुषार पाटील, कुणाल सुतार, आर्यन घाटगे, सार्थक कांबळे यांच्या हस्ते होमहवन विधी झाला. पौराहित्य अभी कुलकर्णी, बाबुराव महाराज यांनी केले.
वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचे दर्शन महिलांना घेत येत असल्याने यावेळी महिलांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. यानिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्याबरोबरच रांगोळी रेखाटण्यात आली होती. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले, राजाराम पाटील, भैरु आंबोले, सदाशिव पाटील, शंकर भाटले, सद्दाम खानापूरे, अरविंद पारळे, ईश्वर पारळे, पिंटू पठाडे, किशोर पारळे यांच्यासह भाविक उपस्थित होते.