महापालिका आयुक्तांनी घेतली महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱयांची बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत चालल्याने मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱयांची बैठक घेऊन विविध सूचना करण्यात आल्या होत्या. पण नाईट कर्फ्यू व विपेंड कर्फ्यू लागू करण्यात आल्याने निवडणुकीच्या कामामधून मुक्त झालेल्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱयांवर कोरोना नियमावलीच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविली आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱयांची नियुक्ती करून जनजागृती व विनामास्क फिरणाऱयांवर कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबत सोमवारी बैठक घेऊन विविध सूचना करण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने बुधवार दि. 21 एप्रिल ते 4 मेपर्यंत नाईट कर्फ्यू व विपेंड कर्फ्यूची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करण्याची जबाबदारी आता महसूल विभागाच्या कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱयांवर मार्च महिन्यात महसूल वसुलीची जबाबदारी सोपविण्यात येते. पण लोकसभा पोटनिवडणुकीमुळे महसूल विभागाचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त होते. निवडणुकीच्या कामामधून मुक्त होताच आता कोरोना नियमावलीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविली आहे.
बुधवारी सकाळी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. व आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱयांची बैठक घेतली. नाईट कर्फ्यू व विपेंड कर्फ्युच्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची सूचना केली. शहर व उपनगरांतील हॉटेल, बार, मॉल, बाजारपेठ आदी गर्दी होणाऱया ठिकाणी नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली. विनामास्क फिरणाऱयांवर, सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष करणाऱयांना सूचना कराव्यात. सूचना करूनही नियमावलीकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला. नाईट कर्फ्यु व विकेण्ड कर्फ्युअंतर्गत देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱयांवर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली. हॉटेल, मॉल, बार आदी ठिकाणी पार्सल घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना विविध सूचना करण्यात आल्या. जबाबदाऱया काळजीपूर्वक पार पाडण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला.