-महाराष्ट्र चेंबरच्या बैठकीनुसार कोल्हापूर चेंबरचा निर्णय
कोल्हापूर : फोटोः 9 एप्रिलः इम्रानः1408,1341ः कोरोनामुळे व्यवसाय कधी सुरू करायचा ? याबाबत कोल्हापूर चेंबरची बैठक झाली.या बैठकीत बोलताना संजय शेटे.सोबत धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार,संजय पाटील, जयेश ओसवाल.
प्रतिनिधी / कोल्हापूर
` कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून कोल्हापूर जिह्यातील सर्व व्यापारी आस्थापने सोमवारपासून उघडण्याचा निर्णय, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न व्यापारी संघटनाच्या बैठकीत एकमुखी घेण्यात आला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरच्या निर्णयाबाबत शुक्रवारी आयोजित केलेल्या कोल्हापूर चेंबरच्या बैठकीत हा निर्णय झाला.
यासंदर्भात 8 रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर या राज्यस्तरीय व्यापारी संघटनेची, सर्व राज्यातील व्यापारी असोसिएशनशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक झाली. या बैटकीमध्ये सर्व व्यापारी आस्थापने उघडण्याबाबत, शासनाचा कोणताही निर्णय किंवा कोणतेही परिपत्रक जारी केलेले नाही. तरीही “कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून राज्यातील सर्व व्यापारी आस्थापने सोमवारपासून उघडायचाच असा निर्णय घेण्यात आला.
30 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत `ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून उर्वरीत सर्व व्यापारी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर यांचेबरोबर झालेल्या बैठकीमध्ये, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. कोल्हापूर चेंबरतर्फे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरच्या निर्णयास उत्स्फूर्त पाठींबा असल्याचे शेटे यांनी सांगितले. “कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून जिह्यातील सर्व व्यापारी आस्थापने सोमवारपासून उघडणार.” अशी ग्वाही दिली. या बैठकीमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल, राजू पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी संचालक प्रशांत शिदे, राहूल नष्टे, अजित कोठारी, संपत पाटील, अनिल धडाम, प्रकाश केसरकर, प्रदीप भारमल, कुलदीप गायकवाड, जयंत गोयानी, तौफिक मुल्लाणी, सिमा जोशी, शिवानंद पिसे, धर्मपाल जिरगे व अतुल शहा तसेच सर्व व्यापारी उपस्थित होते.