उपचाराशिवाय ठेवले जायचे कुष्ठरोगाचे रुग्ण
जगातील अनेक बेटं स्वतःच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रख्यात आहेत. यापैकीच एक बेट कुष्ठरोगाच्या रुग्णांसाठी जगभरात ओळखले जाते. येथे कुठल्याही उपचाराशिवाय कुष्ठरोगाच्या रुग्णंना ठेवले जात होते. कुष्ठरोगाच्या रुग्णांना समाजात नेहमीच हीनभावनेने पाहिले गेले आहे. या आजाराला एका अभिशापाप्रमाणे मानले गेले. भारतच नव्हे तर अन्य देशांमध्येही अशा रुग्णांसोबत क्रूर वागणूक होत असल्याचे समोर आले आहे.
एक बेट कुष्ठरोगाच्या रुग्णांशी जोडलेले राहिले आहे. युरोपयी देश ग्रीसने कुष्ठरोगाच्या रुग्णांना या बेटावर पाठविले होते. या देशांनी सर्वसामान्य लोकांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी या बेटावर ठेवले होते. या बेटाला स्पिनालाँगा नावाने ओळखले जाते. हे बेट ग्रीसचे सर्वात मोठे बेट क्रीटनजीक आणि भूमध्य समुद्रात मिराबेलोच्या उपसागराच्या मुखावर आहे. कधीकाळी कुष्ठरोगाच्या रुग्णांसाठी ओळखले जाणारे हे बेट आता निर्जन ठरले आहे.
व्हेनिसच्या राजाने या बेटावर सर्वप्रथम सैन्यतळ निर्माण केला होता. त्यानंतर तुर्कस्तानच्या ऑटोमान साम्राज्याने याला वेढा घेतला होता. परंतु 1904 मध्ये क्रीटच्या लोकांनी तुर्कांना येथून हुसकावून लावले होते. त्यानंतर येथे कुष्ठरोगाच्या रुग्णांना ठेवले जाऊ लागले. 1975 मध्ये जगाला याबद्दल माहिती कळली होती. याप्रकरणी जागतिक समुदायाने ग्रीसवर टीकेची झोड उठविली होती. जागतिक पातळीवरून लक्ष्य ठरलेल्या ग्रीसने त्यानंतर रुग्णांवर उपचार सुरू करत बेटावरील केंद्र बंद केले होते. त्यापूर्वी बेटावर एकमात्र डॉक्टर यायचा, तो देखील रुग्णांना अन्य कुठला आजार झाला तरच उपचार करायचा.