फाशीला स्थगिती देण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खूनप्रकरणातील दोषी मुकेश कुमार याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार आाि खूनप्रकरणी अक्षय कुमार सिंह, पवन सिंह, विनयकुमार शर्मा याणि मुकेश सिंह या दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व दोषींना 1 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात यावी, असा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला आहे. दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता फाशीची शिक्षा सुनावली जाणार आहे. यापूर्वी दोषींना भेटण्याबाबत नातेवाईकांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आता चारही दोषींच्या अंतिम इच्छेची प्रतीक्षा आहे, असे तिहार कारागृहाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.