धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितीज प्रसाद, अभिनेत्री रकुल प्रीतच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
प्रतिनिधी/ मुंबई
सुशांत सिंह राजपूत मफत्यू प्रकरणात बॉलिवुडमधील अनेक मोठय़ा हस्तींची नावे समोर येण्यास सुरुवात झाली असुन, याप्रकरणात करण जोहरचे देखील नाव समोर आले असुन, तो एनसीबीच्या निशाण्यावर आला आहे. 2019 साली झालेल्या पार्टीचे आयोजन करण जोहरने केले असुन, याप्रकरणी मोठय़ा प्रमाणांत ड्रग्जचा वापर झाल्याचे समोर आल्याची माहिती एनसीबी अधिकाऱयाने दिली.
तसेच धर्मा प्रॉडक्शनचे क्षितीज रवि प्रसाद याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतुन देखील अनेकदा करण जोहरचे नाव समोर आले आहे. तसेच शुकवारी सकाळी एनसीबीने धर्मा प्रॉडक्शन येथे छापेमार करीत क्षितूज प्रसाद अ]िण अनुभव या मॅनेजरला ताब्यात घेत त्यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आणले. तर दुसरीकडे अभिनेत्री रकुल प्रितही चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल होताच, एनसीबी अधिकाऱयानी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यास सुरुवात केली. यावेळी रकुल प्रीतने ड्रग्जची कबुली देत, तीने रियाचे नाव घेतले. रिया तिच्या घरात ड्रग्ज ठेवत असल्याची कबुली रकुल प्रितने दिली. तसेच यामध्ये आपण निर्दोष असल्याचा दावा केला. तर क्षीतीज प्रसादने देखील त्याच्या चौकशीतुन अनेक धक्कादायक खुलासे केल्याचे एनसीबी अ]िधकाऱयाने सांगितले. त्यानंतर एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह या बडय़ा अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. या अभिनेत्रींसह एकूण 7 सेलिब्रिटीजना एनसीबीकडून समन पाठविण्यात आले आहे. तसेच आणखी जवळपास 39 सेलिब्रिटी एनसीबीचीच्या रडारवर आहेत. अशावेळी दीपिकाच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
वॉट्सऍप ग्रुपची ऍडमिन होती दिपीका
दरम्यान, ड्रग्जच्या पुरवठय़ासाठी तसेच त्याच्या आवक-जावकसाठी एक वॉट्सऍप ग्रुप निर्माण केला असुन, त्याची ऍडमिन दिपीका असल्याचे समोर आले आहे. यामुळे दिपीकाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच शनिवारी दिपीकाची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या सुरक्षेमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचणार आहे. अशावेळी दादर पोलीस ठाण्याची एक टीम प्रभादेवी याठिकाणी असणाऱया ब्यूमोंडे टॉवर बाहेर तैनात आहे. दीपिका या अपार्टमेंटमध्ये राहते. दुसरीकडे अभिनेता रणवीर सिंग याने एनसीबीकडे असा अर्ज केला आहे की, दीपिकाच्या चौकशीदरम्यान त्याने तिथे असणे आवश्यक आहे कारण तिला कधी कधी पॅनिक ऍटॅक येतात आणि भीती देखील वाटते. त्यामुळे त्याला दीपिकाबरोबर असण्याची परवानगी देण्यात यावी.