पियुष गोयल : मे मध्ये 36 टक्क्यांची घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील निर्यातीत काही प्रमाणात सुधारणा होत असून मे महिन्यात निर्यात 36 टक्क्मयांनी घटली आहे. परंतु ही तुलना एप्रिल महिन्यासोबत केल्यास यात सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. एप्रिलमध्ये निर्यात 60 टक्क्मयांनी घटली होती, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
देशात कोविड व लॉकडाऊनच्या संकटामुळे उद्योग क्षेत्र पूर्णपणे थांबले होते. परंतु सध्याच्या निर्यात क्षेत्रातील कामगिरीमुळे काही प्रमाणात उद्योग क्षेत्र उभारी घेत असल्याचे पहावयास मिळत असल्याचे मंत्री गोयल यांनी सांगितले. निर्यातीच्या दृष्टीने ही चांगली बाब म्हणता येईल. देशातील बिगर तेल निर्यात (पेट्रोलियम आणि लुब्रिकंट)फक्त 30 टक्क्मयांनी घटले आहे. याच आकडय़ामधून ही सुधारणा होत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आगामी काळात अन्य क्षेत्रातही काही प्रमाणात ही तेजी निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
देशातील उलाढाल ठप्प झालेने मागील दोन महिन्यातील निर्यातीवर परिणाम झाल्यामुळे 30 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये निर्यात आणि पुरवठाधारक कंपन्या यांनी कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
नुकसान भरपाई
पुढील वर्षातील मार्च 2021पर्यंत आपण एप्रिल आणि मे महिन्यातील बंदमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यात यशस्वी होऊ असा विश्वास गोयल यांनी व्यक्त करत उद्योग क्षेत्राने आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न केल्यास आपण नुकसान निश्चितच भरून काढू, असाही दावा मंत्री गोयल यांनी केला आहे.