मोहक फुले पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होणार
केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार येथील शालोम हिल्स पुन्हा चर्चेत आले आहे. तेथे 12 वर्षांनी फुललेल्या नीलकुरिंजींच्या फुलांनी बहरलेला 3 हजार हेक्टरमध्ये फैलावलेला डोंगराळभाग अत्यंत मोहक दिसून येत आहे. ही फुलं जुलै-ऑगस्टमध्ये फुलतात आणि ऑक्टोबरपर्यंत त्यांचे अस्तित्व कायम राहते. दुर्लभ नीलकुरिंजीचे फुल 30 ते 60 सेंटीमीटरपर्यंत उंच असते. याचे फुल स्वतःच्या जीवनकाळात एकदाच फुलते. आता तेथे नवी फुले 2033 मध्ये फुलणार असल्याची माहिती मदर टेरेसा युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डॉ. ए. उषा राजा नंथिनी यांनी दिली आहे.
विशेष बाब म्हणजे नीलकुरिंजीच्या फुलांमधून प्राप्त मध 15 वर्षांपर्यंत खराब होत नाही. नीलकुरिंजीची फुले पहिल्यांदा 2006 मध्ये तामिळनाडू आणि केरळमध्ये पाहिली गेली होती. भारतात दुर्लभ नीलकुरिंजीच्या 46 प्रजाती आहेत. केरळमधील लोक या फुलांची आतुरतेने प्रतीक्षा करतात, कारण त्यांना समृद्धीचे प्रतीक मानले जाते. दुसरीकडे या फुलांना पाण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. यापूर्वी 2018 मध्ये मुन्नारच्या अनामलाई हिल्सवर नीलकुरिंजीच्या फुलांचा बहर दिसून आला होता.