बेळगाव
नूतन पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी शनिवारी दुपारी सुत्रे स्वीकारली. मावळते आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.
शुक्रवारी रात्री पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला होता. शनिवारी दुपारी नूतन पोलीस आयुक्तांनी सुत्रे स्वीकारली. सायंकाळी केएलई संस्थेच्या डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात डॉ. त्यागराजन यांना निरोप देण्यात आला. याच कार्यक्रमात डॉ. बोरलिंगय्या यांचे स्वागत करण्याचा कार्यक्रमही झाला.
बोरलिंगय्या हे 2008 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या गुप्तचर विभागात पोलीस प्रमुख म्हणून काम करीत होते. त्यांना डीआयजी पदावर बढती देवून बेळगाव पोलीस आयुक्त पदावर त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. पोलीस दलात लवकरच आणखी उलथापालथी होणार, याचे संकेत आहेत.