बांदा – प्रतिनिधी-
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नेतर्डे नं.१ या शाळेच्या इयत्ता ५वी मधील विद्यार्थिनी कु. दीपश्री दीपक नाईक जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा नेतर्डे नं.1 हिने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आयोजित समावेशीत शिक्षण उपक्रम समता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धा 2021 (वयोगट 7 ते 11) या स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळविला आहे. या तीच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक समिती, शिक्षक पालक समिती मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांचे मार्फत कौतुक करण्यात येत आहे.