प्रतिनिधी/ सांगे
सांगे तालुक्मयातील नेत्रावळी येथील वाढत्या कोरोना प्रकरणांची दखल घेऊन सांगेचे उपजिल्हाधिकारी सागर गावडे यांनी स्थानिक आमदार प्रसाद गावकर यांच्यासह नेत्रावळीला भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी गावडे यांनी सांगितले की, नेत्रावळी परिसरात 36 कोरोना रुग्ण सापडले आहेत. ते सर्व जण घरात विलगीकरणात आहेत. फक्त दोन ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आढळून आल्याने आपण सांगे प्राथमिक आरोग्य केंद्राचा अहवाल घेऊन सदर दोन्ही ठिकाणे मायक्रो-कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांना शिफारस करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सांगेचे मामलेदार मनोज कोरगावकर, पोलीस निरीक्षक सचिन पन्हाळकर, आरोग्य निरीक्षक विनय नाईक हजर होते. यावेळी बोलताना आमदार गावकर यांनी सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. नेत्रावळीतील दाभाळ आणि गवळीवाडा व आजुबाजूस रुग्णसंख्या जास्त असून प्रशासन तेथे मायक्रो-कंटेनमेंट झोन घोषित करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे, असे त्यांनी सांगितले.
पूर्ण लॉकडाऊन गरजेचा
सध्याचा लॉकडाऊन हा केवळ नावापुरता आहे. पूर्ण लॉकडाऊन गरजेचा आहे. सुरुवातीच्या काळात जसा लॉकडाऊन होता तसा तो आता काही दिवस पाहिजे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारने त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आमदार गावकर यानी व्यक्त केली आहे. जनतेला ‘एसओपी’चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, सांगे तालुक्मयात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. चाचणी प्रक्रियेवर ताण पडला आहे. चाचणीचा अहवाल वेळेवर मिळत नाही तसेच तपासणीसाठी येणाऱयांची संख्या वाढल्याने तासन्तास उन्हात ताटकळत रहावे लागते ही सध्याची स्थिती आहे.