वृत्तसंस्था/ हैदराबाद
नेल्लोर आणि तिरुपती रेल्वे स्थानक पुनर्विकासासाठी जीएमआर आणि अदानीसह 28 कंपन्यांनी कंत्राट मिळवण्यासाठी अर्ज केले असल्याचे सांगण्यात येते.
रेल लँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने इच्छुकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले होते. जीएमआर, गोदरेज, ओबेराय, अदानी, ऍम्बीयन्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, शोभा, ब्रिगेड व ऍम्बसी अशांसह सुमारे 30 कंपन्यांनी रेल्वेस्थानक विकासासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. मंदिरांसाठी प्रसिद्ध असणारी ही रेल्वे स्थानके सार्वजनिक खासगी भागीदारीतून पुनर्विकसित करण्याची योजना असून यासंदर्भात रेल लँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी यांनी ऑनलाइन अर्ज मागवले होते. तिरुपती रेल्वेस्थानकासाठी 510 कोटी रुपये तर नेल्लोर रेल्वेस्थानकासाठी 130 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्राधिकरणाने पुनर्विकासासाठी संबंधितांकडून ऑनलाइन टेंडरही मागवले आहेत. प्राधिकरणाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आतापर्यंत 62 रेल्वेस्थानके विकसित केली असून याअंतर्गत वरील दोन स्थानके विकसित केली जाणार आहेत.