प्रतिनिधी/ बेळगाव
शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ा सुरूच आहेत. नेहरुनगर येथील एका किराणा दुकानाचे कडीकोयंडा तोडून रोकड लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
नेहरुनगर, दुसऱया क्रॉसवरील प्रकाश जनरल स्टोअर्समध्ये चोरीचा प्रकार घडला आहे. मुख्य शटर वगळता दुकानाच्या बाजुला आणखी एक छोटा दरवाजा आहे. या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश केला आहे. गल्ल्यातील सुमारे 12 हजार रुपये चोरटय़ांनी पळविले आहेत.
दुकान मालकाने एपीएमसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी खोली भाडय़ाने द्यायची आहे का? अशी विचारणा करीत एक अपरिचित इसम पहाटे या परिसरात आला होता. त्याने हा प्रकार केला आहे का? असा संशय बळावला आहे. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.