ऑनलाईन टीम / नोएडा :
उत्तर प्रदेशातील गौतमनगर जिल्ह्यात 7 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त आशुतोष द्विवेदी म्हणाले की, उत्तर प्रदेश आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 2 चे उप कलम (जी) अंतर्गत कोविड 19 च्या महामारीला आपत्ती घोषित केले आहे.
ते म्हणाले की, 23 डिसेंबरला माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरण सिंह यांची जयंती आहे. 25 डिसेंबरला ख्रिसमस आणि 1 जानेवारी 2021 नवीन वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा परिस्थितीत असामाजिक तत्वांद्वारे शांती व्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे.
पुढे ते म्हणाले की, महामारीची आत्ताची परिस्थिती आणि गंभीरता लक्षात घेऊन 6 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 पर्यंत जनपद गौतमबुध्दनगरमध्ये कलम 144 जारी करण्यात आले आहे. दरम्यान, गौतमबुद्ध नगरमध्ये रविवारी कोरोनाचे 138 रुग्ण आढळून आले. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 23 हजार 458 वर पोहोचली आहे. तर सद्यस्थितीत 1,051 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.