- खोकला, सर्दीसह पोटात भरले पाणी
ऑनलाईन टीम / नोएडा :
जवळपास एक महिन्यानंतर मंगळवारी नोएडा येथील चाईल्ड पीजीआयमध्ये एका चार वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मुलामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची तपासणी केली असता या चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर या मुलाला सेक्टर 29 मधील भारद्वाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याची प्रकृती पुन्हा बिघडल्याने पुढील उपचारासाठी या मुलाला सेक्टर 30 मधील सुपर स्पेशालिटी पेडियाट्रिक अँड पोस्ट ग्रॅज्युएट टिचींग इन्स्टिट्युट येथे पाठविण्यात आले.
डॉ. ज्योत्स्ना मदान यांनी सांगितले की, या मुलाला दुपारी एक वाजता रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळेचे त्या मुलाची परिस्थिती लक्षात घेता त्याला तात्काळ वॉर्डमध्ये दाखल केले. मुलाला तीव्र ताप, खोकला आणि सर्दी होती. तसेच मुलाच्या पोटात पाणी भरले आहे.