वृत्तसंस्था/ ऍडलेड
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेकच्या नवोदित लिंडा नोसकोव्हाने उपांत्य फेरीच्या सामन्यात टय़ुनेशियाच्या जेबॉरचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता या स्पर्धेत नोसकोव्हा आणि आर्यना साबालिनेका यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नोसकोव्हाने जेबॉरचा 6-3, 1-6, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. दुसऱया उपांत्य सामन्यात द्वितीय मानांकित साबालिनेकाने बेगूचा 6-3, 6-2 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत अमेरिकेच्या आशिया मोहमद आणि टेलर टाऊनसेंड यांनी दुहेरीचे जेतेपद मिळवताना ऑस्ट्रेलियाच्या टॉप सिडेड हंटर आणि झेकच्या सिनियाकोव्हा यांचा 6-2, 7-6(7-2) असा फडशा पाडत अंजिक्यपद पटकावले.