वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
येत्या जानेवारी महिन्यात न्यूझीलंड क्रिकेट संघाची भारत आणि पाकिस्तान विरुद्ध वनडे मालिका खेळविल्या जाणार आहेत. या मालिकांसाठी क्रिकेट न्यूझीलंडने संघाची घोषणा केली आहे.
क्रिकेट न्यूझीलंडतर्फे या दोन्ही मालिकांसाठी वनडे संघाची स्वतंत्र निवड केली आहे. वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचे नेतृत्व केन विल्यम्सनकडे सोपविण्यात आले असून कसोटीसाठी टीम साऊदीकडे न्यूझीलंडचे नेतृत्व राहिल. दोन्ही मालिकांसाठी प्रशिक्षक वर्गातही बदल करण्यात आला आहे. पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 10, 12, 14 जानेवारीला खेळविली जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या मध्यंतराला न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये कसोटी मालिका होणार आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 18, 21 आणि 24 जानेवारीला तसेच त्यानंतर या उभय संघात टी-20 मालिका 27, 29 जानेवारीत आणि 1 फेब्रुवारी दरम्यान होणार असून या दोन्ही मालिकांसाठी न्यूझीलंडचे प्रशिक्षकपद राँची यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. भारता विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचे नेतृत्त्व लेथम करणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात चॅपमन, व्होल्टेस, डफी यांचा समावेश असून विल्यम्सन आणि साऊदी उपलब्ध राहणार नाहीत. भारताविरुद्धच्या या दोन्ही मालिकेसाठी न्यूझीलंड संघात निकोल्स आणि सोधी यांचे पुनरागमन झाले आहे. भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा 9 जानेवारीला केली जाणार आहे.
न्यूझीलंड संघ ः पाक आणि भारताविरुद्धच्या मालिकेसाठी – केन विल्यम्सन (पाकविरुद्धच्या मालिकेसाठी कर्णधार), टॉम लॅथम (भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी कर्णधार), ऍलेन, ब्रेसवेल, चॅपमन (केवळ भारताविरुद्धच्या मालिकेसाठी), कॉन्वे आणि डफी (भारता विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी), फर्ग्युसन, हेन्री, मिल्ने, मिचेल, निकोल्स, फिलिप्स, सँटनर, शिप्ले, सोधी, साऊदी (पाक विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी).