ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबाराची घटना घडली. एका वादातून झालेल्या या गोळीबारात एका चार वर्षीय मुलीसह तीन जण जखमी झाले आहेत. मात्र, गोळीबारात जखमी झालेल्यांचा या वादविवादाशी कोणताही संबंध नसल्याचे एका वृत्तसंस्थेने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे.