ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाईम स्क्वेअरमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी चीनविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना निदर्शकांनी श्रद्धांजली वाहिली.
‘भारत माता की जय’ चा नारा देत फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने चीनविरोधात उग्र निदर्शने केली. निदर्शकांनी तिबेटींच्या स्वातंत्र्य लढ्यालाही पाठिंबा देत चिन्यांनो तिबेट सोडून जा, अशाही घोषणा देत फलक फडकावले. चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्धारही या नागरिकांनी व्यक्त केला.
चीन 18 देशांच्या विरोधात कुरघोड्या करत आहे. त्यामुळे चीनविरोधात या 18 देशांच्या राजदूतांना एकत्र आणून प्रभावी आघाडी उघडण्याची गरज आहे. हे काम फक्त आता भारतच करू शकतो, असे भारतीय वंशाचे सामाजिक कार्यकर्ते भंडारी यांनी म्हटले आहे.