नगराध्यक्षांना घेराव, बेकायदा विक्रेत्यांसंबंधी कैफियत
प्रतिनिधी /मडगाव
सडेकर लेन, पिंपळकट्टा आणि मार्केटच्या सभोवती परिसरात बेकायदा विपेत्यांनी ठाण मांडल्याने सणासुदीच्या काळातही व्यवसाय होत नसल्याची कैफियत घेऊन न्यू मार्केटमधील विपेत्यांनी शुक्रवारी सकाळी मडगाव पालिकेवर मोर्चा नेला आणि नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांना घेराव घातला. बेकायदा विपेत्यांवर कारवाई का केली जात नाही, असा जाब नगराध्यक्षांना विचारण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांच्या कक्षात उपनगराध्यक्षह व मार्केट समितीच्या अध्यक्षा दिपाली सावळ तसेच सदस्य नगरसेवक महेश आमोणकर, राजू नाईक उपस्थित होते.
नगराध्यक्ष पेरेरा यांनी आपण न्यू मार्केटमधील विपेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे सांगितले. आपण मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांना न्यू मार्केट तसेच सभोवतालील परिसरात देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेले मार्केट निरीक्षक तसेच कामगारांची रोटेशन पद्धतीवर दर महिन्यात अदलाबदली करण्याचे निर्देश देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक कारवाई करण्यासाठी आवश्यक त्या वेळी खास मोहीम राबविण्यात येणार असल्याचे नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. आमच्या कित्येक मागण्या पालिकेकडे पडून आहेत. त्या मान्य न झाल्यास आम्ही प्रसंगी मार्केट बंद ठेवून पालिकेवर धडक मोर्चा आणू. आम्ही यासाठी अखिल गोवा विपेते संघटनेची मदत घेऊ, असे एका विपेत्याने सांगितले.