ऑनलाईन टीम / काबुल :
आजवर अजिंक्य असलेल्या पंजशीर प्रांतावर तालिबानने कब्जा केला असून, नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांसोबत सुरू असलेले तालिबानचे युद्ध आता संपले आहे. त्यामुळे तालिबान आता युद्धमुक्त झाल्याची घोषणा तालिबानकडून करण्यात आली आहे.
तालिबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहिद्दीनने यासंदर्भात एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पंजशीर प्रांत वगळता संपूर्ण अफगाणिस्तावर 16 ऑगस्टपासून तालिबानने ताबा मिळवला. त्यानंतर नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये तालिबानचे युद्ध सुरू होते. रविवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर शत्रुच्या ताब्यातील पंजशीरवर आम्ही पूर्णपणे ताबा मिळवला आहे. त्यामुळे देश युद्धमुक्त झाला आहे. पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सच्या दबावाखाली असणाऱया स्थानिकांची आम्ही सुटका केली आहे.
प्रत्येक प्रांताला शांतता पुरविण्याठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे देशातील नागरिक शांततेत, समृद्ध जीवन जगतील, असा विश्वासही तालिबानने व्यक्त केला आहे.