ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नौदलाचे मिग-29 हे लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे पंजाबमधील होशियारपूरजवळील रुडकी गावात कोसळले. विमानातील दोन्ही पायलटने वेळीच प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या सहाय्याने उडी घेतल्याने ते सुखरूप बचावले. आज सकाळी साडेअकरा वाजता ही दुर्घटना घडली. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे.
वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटनुसार, नौदलाच्या मिग-29 या लढाऊ विमानाने सकाळी 10 वाजता जालंधरमधील आदमपूर येथून उड्डाण केले होते. काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमानात आग लागली. त्यानंतर काही क्षणातच पंजाबमधील होशियारपूरजवळील रुडकी गावात हे विमान कोसळले. या विमानात दोन पायलट होते. त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या सहाय्याने उडी घेतल्याने ते सुखरूप बचावले.