ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 562 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 21 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 37 हजार 999 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या एकूण 1,37,999 रुग्णांपैकी 1 लाख 28 हजार 727 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 338 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 4,934 रुग्णांवर उपचार सुरू
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 27 लाख 56 हजार 807 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 4 हजार 934 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 127 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत.