ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 368 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 09 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 66 हजार 239 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1,66,239 रुग्णांपैकी 1 लाख 57 हजार 043 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 331 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 38 लाख 78 हजार 599 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 3 हजार 865 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 73 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 16 जण व्हेंटिलेटरवर आहेत.