ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 445 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 23 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 42 हजार 082 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 570 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर आता पर्यंत आढळलेल्या एकूण 1,42,082 रुग्णांपैकी 1 लाख 32 हजार 001 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 480 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 28 लाख 78 हजार 477 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 601 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 156 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 18 जण व्हेंटिलेटरवर आहेत.