ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 476 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 13 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 27 हजार 630 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 958 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत एकूण 1,27,630 रुग्णांपैकी 1 लाख 17 हजार 833 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 012 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 23 लाख 21 हजार 084 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 5 हजार 735 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 145 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 23 जण व्हेंटिलेटरवर आहेत.