ऑनलाईन टीम / तरुण भारत
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा काल दि. 19 रोजी शपथविधी पार पडला यात मुख्यमंत्र्यांसह पंजाबच्या 10 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर काहीवेळाच तातडीने मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या पहिल्याच बैठकीत पोलीस दलातील १० हजार पदांसह राज्याच्या निरनिराळय़ा खात्यांतील २५ हजार रिक्त पदे भरण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली.
मंत्रिमंडळ स्थापन केल्या – केल्या पहिल्याच बैठकीत अध्यक्षस्थान भूषवल्यानंतर मान यांनी दूरसंवाद संदेशाद्वारे या निर्णयाची घोषणा केली. या करीता जाहिरात व त्याबाबतची अधिसूचना जारी करण्याची प्रक्रिया एका महिन्याच्या आत सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. मान यांनी‘निवडणुकीदरम्यान प्रचार करताना दिलेले आश्वासन ही येत्या काही दिवसांत आम्ही पूर्ण करू,’ असे ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना मान यांनी १० हजार नोकऱ्या पंजाब पोलिसांना, तर उर्वरित इतर खाती, मंडळे व महामंडळांमध्ये नोकऱ्या दिल्या जातील. तसेच या नोकऱ्या देताना त्या गुणवत्तेच्या आधारावर देण्यात येतील आणि त्यात कुठलाही पक्षपात, शिफारस किंवा लाच यांना वाव राहणार नाही, असे मुख्यमंत्री मान यावेळी सांगितले.