ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील रुग्णांनी 2.82 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात 3,329 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 63 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 82 हजार 505 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 3,173 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2,82,505 रुग्णांपैकी 2 लाख 46 हजार 583 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 7 हजार 672 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 64 लाख 40 हजार 181 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 32,242 टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या. सद्य स्थितीत 28 हजार 250 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 374 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 51 जण व्हेंटिलेटरवर आहेत.