पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर येथील गजानन महाराज मठामागील झोपडपट्टीमध्ये सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मुलाने आपल्या सावत्र आईचा खून केला. धारदार शस्त्राने वार करीत सदरचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन महाराज मठा मधली लक्ष्मीनगर या झोपडपट्टीमध्ये कदम कुटुंब वास्तव्यास आहेत. यामधील 45 वर्षीय प्रभावती कदम यांचा त्यांच्या सावत्र मुलासोबत बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर भांडणात मध्ये झाले. आणि यातूनच प्रभावती यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.