नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रपती भवनातील सूत्रांकडून देण्यात आली. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी लेह-लडाखला भेट देत तेथील स्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेचा सविस्तर तपशील उघड करण्यात आला नसला तरी ‘राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या’ मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती ट्विटद्वारे जारी करण्यात आली आहे.