ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी नऊ वाजता व्हिडिओच्या माध्यमातून देशवासीयांची संवाद साधणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे.
हा व्हिडिओ संदेश देशामध्ये वाढत चाललेल्या कोरोना व्हायरस संबंधित असणार आहे अशी चर्चा आहे.
त्याचबरोबर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, उद्योगपती, मीडिया प्रमुख यांच्याशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला एक दिवसांचा जनता कर्फ्यू आणि त्यानंतर 21 मार्चला लॉक डाऊन करत असल्याची घोषणा केली. लॉक डाऊन नंतर आता पंतप्रधान प्रथमच देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता उद्या पंतप्रधान काय घोषणा करतील याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.