वार्ताहर/ सांबरा
पंत बाळेकुंद्री येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर मंदिर सोमवार दि. 9 नोव्हेंबरपासून भाविकांना दर्शनासाठी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत खुले राहणार आहे.
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर बऱयाच दिवसापासून भाविकासाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. सध्या कोरोना रोगाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असल्याने मंदिर खुले करण्याचा निर्णय दत्त संस्थानाने घेतला आहे. मंदिरला येतेवेळी भाविकांनी मास्क वापरणे सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. सध्या पौर्णिमा, अमावस्येची पालखी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सद्यपरिस्थिती अन्नछत्रातील प्रसाद व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तसेच भाविकांनी श्रीक्षेत्री मुक्कामास राहू नये, मुक्कामासाठी मठी देता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे श्री दत्त संस्थानच्यावतीने कळविण्यात आले.