प्रतिनिधी / हुपरी
पट्टणकोडोली (ता.हातकणंगले) येथील एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूस असलेल्या बेघर वसाहतीमध्ये राजरोस चालू असलेल्या तीन पाणी जुगार अड्यावर शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने छापा टाकला.यावेळी जुगार खेळताना आढळून आलेल्या घरमालकासह अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यामध्ये मोबाईल, जुगाराचे साहित्या व रोख रक्कमेसहित ५१ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.
पोलीसांतून मिळालेली माहिती अशी, पट्टणकोडोली येथील एमआयडीसीजवळील बेघरवसाहतीमध्ये बंदेनवाझ अकबर मुल्ला याच्या मालकीच्या घरामध्ये बाबासो ईस्माईल सुळकुडे याचा तीन पाणी जुगार अड्डा राजरोसपणे सुरु होता.शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरु असलेला बंदी आदेश डावलून तोंडाला विना मास्क घालता अकरा जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्यावर या पथकाने हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून रोख रक्कम २४ हजार ४०० रुपये सहित व मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असे ५१ हजार ८०० चा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईमध्ये बाबासो ईस्माईल सुळकुडे, शक्ती अशोक मछले, इरफान बाळासो जमादार, बापू आप्पाजी बेल्ले, राघू कल्लाप्पा लाली, दिपक अशोक कांबळे, बंदेनवाझ अकबर मुल्ला सर्व रा.पट्टणकोडोली, अनिल श्रीपती कलगुट्टी रा.कबनूर, शब्बीरमहंमद हनीम मुल्ला, बाळासो लहू सोनुले दोघे रा. गडमुडशिंगी व संगाप्पा बाळू औरसंग रा.टाकवडे वेस इचलकरंजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधीक तपास हुपरी पोलीस ठाण्याचे पी. आय. राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कोळी हे करीत आहेत.