इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागाझातर्फे 11 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /पणजी
पणजी येथील इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागाझातर्फे दि. 11 व 12 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमीत्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 रोजी दुपारी 3 वा गोव्यातील 16 वर्षावरील नाटय़संगीत गायक कलाकारांसाठी सवेश एकल नाटय़गीत गायन स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर दि 12 रोजी गोवा-गोव्याबाहेरील कलाकारांचा मुजरा संगीत रंगभूमीला हा नाटय़संगीताचा इतिहास व नाटय़गीत गायन मैफल कार्यक्रम आणि गोव्यातील जे÷ रंगकर्मीचा सत्कार सोहळा असेल.
सर्वेश नाटय़गीत गायन स्पर्धेस गुरुवार दि 11 रोजी दुपारी 3 वा सुरुवात होणार आहे. सवादासह सर्वेश (एकल) नाटय़गीत गायन सादरीकरणास 8-10 मिनिटाचा कालावधी देण्यात येतील. संगीतसाथ व रंगभूषाकार संस्थेतर्फे पुरविण्यात येईल. स्पर्धकांना स्वतः संगीतसाथी आणण्याची मुभा असेल. वेशभूषेसाठीची व्यवस्था स्पर्धकानी स्वतः करावी लागेल. प्रवेश अर्जात नाटकाचे नाव, पात्र, नाटय़गीताचे शब्द व मो. नंबर लिहून संस्थेच्या ईमेलवर (ग्स्ंज्aहरग्Ÿब्aप्दद.म्दस् ) किंवा वॉटसएप न. 9404165142 किंवा कार्यालयात आणून द्यावे. विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रशस्तीपत्र देण्यात येतील. स्पर्धकांनी स्पर्धेदिवशी दु 3 वाजता हजर राहून प्रथम नावनोंदणी करावी लागेल.
दि 12 रोजी दु. 3.30 का मुजरा संगीत रंगभूमीला या कार्यक्रमात मुकुंद राम मराठे (मुंबई), ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर (मुंबई) व प्रचला आमोणकर या कलाकारांचा मराठी नाटय़संगीताचा इतिहास व नाटय़गीत गायन मैफल होणार आहे. त्यांना दत्तराज सुर्लकर (ऑर्गन), सुभाष फातपैकर (हार्मोनियम) व दत्तराज शेटय़? (तबला) है वादक कलाकार साथसंगत करणार आहे. त्यानंतर गोव्यातील दोन नामवंत जे÷ रंगकर्मीचा सन्मान सोहळा होणार आहे. या दोन दिवसांच्या कार्यक्रमास नाटय़संगीत रसीक प्रेक्षकांनी हजर राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब व सदस्य सचिव दिगंबर काणकोणकर यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी इंन्स्टिटय़ूटच्या कार्यालयात किंवा 0832-2224143 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.