नवी दिल्ली
बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली समूहाने एक मोठे यश संपादन करताना आर्थिक वर्ष 2020-21 वर्षात 30 हजार कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कंपनी येणाऱया काळात म्हणजे पुढील 5 वर्षाच्या कालावधीत एकूण 5 लाख जणांना रोजगार मिळवून देणार आहे. रुची सोयाअंतर्गत 16 हजार 318 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून कंपनीचा निव्वळ नफा 681 कोटी रुपये इतका नोंदला गेला आहे. सदरचा नफा हा मागच्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत पाहता 24 टक्के अधिक आहे.
पतंजली समूहाने रुची सोयाला पुढील 3 ते 4 वर्षात कर्जमुक्त करण्याचे नियोजन केले आहे.