शिराळा वार्ताहर
कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथील पत्रकार सूरज जगताप यांना वाळू तस्करांनी केलेल्या मारहाण प्रकरणी, हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करावी असे निवेदन महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार विशाल नरवाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग येथील पत्रकार सूरज जगताप यांनी येरळा नदीपात्रातून वाळू चोरी सुरु असल्याची माहिती तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिल्यानंतर वाळू तस्करांनी जगताप यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
हल्लेखोरांवर कारवाही करण्याबाबत पोलिसांनी टाळाटाळ सुरु केली असून याबाबत हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ सांगली व शिराळा तालुक्याच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यवाहक प्रतापराव शिंदे, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष बिपीन पाटील, संघटक शिवाजी पाटील, तालुका अध्यक्ष बाजीराव घोडे, सदस्य संजय घोडे- पाटील, माजी तालुका अध्यक्ष प्रितम निकम, मनोजकुमार मस्के, सुरेश पवार, नवनाथ पाटील आदी उपस्थित होते.